Accident News । मोठी बातमी! माजी मुख्यमंत्र्यांच्या कारचा भीषण अपघात

Mehbooba Mufti Accident

Accident News । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील संगममध्ये मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti Accident) यांच्या वाहनाला गुरुवारी अपघात झाला. या घटनेतून मुफ्ती थोडक्यात बचावल्या आहेत. मेहबुबा मुफ्ती यांना दुखापत झालेली नाही.

Car Prices । देशात महागड्या वाहनांची रेकॉर्डब्रेक विक्री, या जर्मन कंपनीने हजारो वाहनांची विक्री केली

पीडीडी मीडिया सेलने दिलेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री मेहबुबा आणि त्यांचे सुरक्षा अधिकारी कोणतीही गंभीर दुखापत न होता सुखरूप बचावले. मात्र, कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. (Mehbooba Mufti Car Accident in Anantnag)

Goa Murder Case । CEO सुचना सेठने मुलाची हत्या करण्यापूर्वी तिच्या पतीला मेसेज केला होता; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, संगम येथे माजी मुख्यमंत्र्यांच्या वाहनाची कारला धडक बसली. ही दुर्घटना घडली तेव्हा मुफ्ती या आगीत पीडितांना भेटण्यासाठी खानबल येथे जात होत्या. मात्र, त्यांना सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला या घटनेत किरकोळ दुखापत झाली आहे. यानंतर पीडीपी अध्यक्ष आपल्या नियोजित दौऱ्यावर निघाल्या.

आम आदमी पार्टीच्या वतीने सोमेश्वर कारखान्याला निवेदन, ऊस वेळेत तोडण्याची केली मोठी मागणी

पीडीपीच्या प्रवक्त्याने सांगितले की मुफ्ती सुरक्षित आहेत आणि त्यांना दुखापत झाली नाही. मेहबुबा यांच्यासोबत त्यांचे सुरक्षा रक्षक आणि पक्षाचे काही नेतेही तेथे असल्याचे सांगण्यात येत आहे.

Ajit Pawar । अजित पवार पुन्हा शरद पवार यांना मोठा धक्का देणार; हालचालींना वेग

Spread the love