Accident News । मोठी बातमी! शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला जाताना कार्यकर्त्यांच्या गाडीचा अपघात; १ जण जागीच ठार तर तीन जण जखमी

Accident news

Accident News । आज सगळीकडे विजयी दशमी दसऱ्याची (Vijaya Dashmi Dasara) धामधूम सुरु आहे. यामध्येच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे, मुंबईत दसरा मेळाव्यासाठी (Mumbai Dasara Melava) ठाकरे आणि शिंदे गटाचे जोरदार तयारी झाली असून यासाठी अनेक कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Samruddhi Mahamarg Accident । समृद्धी महामार्गावर पिकअपचा भीषण अपघात! १४ जण गंभीर जखमी

माहितीनुसार, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Dasara Melava) यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर म्हणजेच शिवतीर्थवर तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde Dasara Melava)) यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात (Azad Maidan) होणार आहे. मात्र शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईला निघालेल्या शिवसैनिकांच्या गाडीला पहाटेच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

Gujarat Bridge Collapse । मोठी दुर्घटना! गुजरातमध्ये पूल कोसळला, एकाचा जागीच मृत्यू; ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती

हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये १ जणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर तर तिघे जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरढोण गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनासथळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये रुपचार सुरु आहेत.

हेल्थ मिनिस्टर स्त्री आरोग्याचे महत्त्व सांगणारा एक आगळावेगळा कार्यक्रम

Spread the love