Accident News । अतिशय भीषण अपघात! बसला ट्रकची जोरदार धडक; एकाच कुटुंबातील ७ जणांचा जागीच मृत्यू तर २५ जखमी

Accident News

Accident News । सध्या अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हरियाणातून ही बातमी समोर आली आहे. हरियाणातील अंबाला येथे गुरुवारी रात्री उशिरा ट्रक आणि मिनी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील सुमारे सात जणांचा मृत्यू झाला. याशिवाय या अपघातात सुमारे 25 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे.

Pune Porsche Accident Case । ब्रेकिंग! पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट; आरोपीचा जामीन रद्द

गुरुवारी, 23 मे रोजी रात्री उशिरा अंबाला येथे ट्रक आणि मिनी बसची धडक झाली. या घटनेत सुमारे सात जणांचा मृत्यू झाला, तर 25 जण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, भाविक बसने वैष्णोदेवीला जात होते. यादरम्यान अपघात झाला. यामुळे सगळीकडे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Nilesh Lanke । ब्रेकिंग! निलेश लंके यांच्या ट्विटमुळे राजकारणात मोठी खळबळ

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृत हे एकाच कुटुंबातील होते. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Sharad Pawar । भाजपसोबत युती करणार का? शरद पवार यांनी दिले उत्तर; म्हणाले…

Spread the love