Accident । संसार थाटण्याआधीच झाला उध्वस्त! लग्नाहून परतताना कारचा भीषण अपघात, नवरा नवरीसह ५ जण जागीच ठार

Accident

Accident । सध्या अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याने नवविवाहित दाम्पत्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. छत्तीसगड मधून ही घटना समोर आली आहे. छत्तीसगडच्या जांजगीर चंपा जिल्ह्यात लग्नाहून परतताना कार आणि ट्रक मध्ये अपघात झाला आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. (Janjgir Champa Accident)

Gopichand Padalkar । चप्पल फेक प्रकरणावरून गोपीचंद पडळकर यांनी दिली संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “…तर त्यांच्या अंगावर कपडेही”

हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये नवविवाहित दांपत्यासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी नवरा-नवरी कारमधून घरी परतत होते. यावेळी हा अपघात झाला आहे. कार ट्रकला धडकल्याने हा भीषण अपघात झाला आहे. ही धडक एवढी भीषण होती की या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. (Chhattisgarh Accident)

Actor Vidyut Jamwal nude photos । अभिनेता विद्युत जामवालचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अपघात घडला त्यावेळी नवरदेव गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळतात तेथील स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले आणि कार मधल्या अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. त्याचबरोबर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शिवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र या अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Suhana Khan । किंग खानच्या लेकीने ओलांडल्या सर्व सीमा, पहिल्याच चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या नातवासोबत…

Spread the love