उच्चशिक्षित तरुणाचा भन्नाट प्रयोग! शेणापासून केला रंग निर्मितीचा उद्योग सुरू

A wonderful experiment of a highly educated young man! Kale color manufacturing industry started from cow dung

काही तरुण शिक्षण (Education) घेऊन नोकरी करत आपले जीवन जगात असतात. मात्र काही तरुण असे देखील असतात जे उच्चशिक्षण घेतात आणि आपल्या मनात येणाऱ्या आयडियापासून वेगेवेगळ्या गोष्टी करत असतात. सध्या देखील हिंगोलीमधील एक उच्चशिक्षित तरुण चांगलाच चर्चेत आला आहे.

अजित पवारांची शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका; म्हणाले, “आज बेरोजगारी मोठ्या प्रमाणात…”

हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli News) वाघजाळी येथील उच्च शिक्षित तरुण सचिन तांबिले यांनी शेणाचा (Dung) वापर करत वॉलपेंट ( Wall Paint) तयार केला आहे. त्यांना नेहमीच काहीतरी नवीन करण्याची इच्छा होती म्हणून त्यांनी शेणापासून रंग निर्मितीचा उद्योग सुरू केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे एक भाषण ऐकून हा उद्योग करण्याची आयडीया आली असं सचिन तांबिले यांनी सांगितले आहे.

एमसीस्टॅन होता वाईट संगतीत! मात्र आईवडिलांनी घेतला ‘हा’ निर्णय आणि बदलले आयुष्य

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भाषण ऐकताना शेणापासून रंग बनवू शकतो असे सांगितले होते. त्यांनतर याबाबत पूर्ण अभ्यास करून याची सर्व माहिती घेतली. आणि स्वतःच्या शेतात असलेल्या गाईच्या शेणापासून रंग तयार करण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी २६ लाखांची गुंतवणूक केली असून एक छोटी कंपनी उभारली आहे. आता त्यांच्या या कंपनीमध्ये सर्व प्रकारचे वॉलपेंट तयार केले जातात.

कसबा चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बजावले ‘हे’ आदेश; वाचा सविस्तर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *