बसचा भीषण अपघात! चौघांचा मृत्यू तर 70 जण जखमी

Accident

तामिळनाडू (Tamil Nadu) येथील कुड्डालोर जिल्ह्यात दोन बसची (Bus Accident) समोरासमोर धडक झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात चौघांना जीव गमवावा लागला आहे तर 70 जण जखमी झाले आहेत. जखमींवर कुड्डालोर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (Latest Marathi News)

मित्रांसोबत केक कापत होता बर्थडे बॉयच्या चेहऱ्याने घेतला अचानक पेट, पहा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ

याबाबत अधिक माहिती अशी की, हा भीषण अपघात तामिळनाडू येथील कुड्डालोर जिल्ह्यातील नेल्लीकुप्पमजवळील पट्टमबक्कम या परिसरात झाला आहे. कुड्डालोर ते पाणरुती दरम्यान एका बसचा टायर फुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ही बस समोरून येणाऱ्या बसवर धडकली. हा अपघात इतका जोरदार होता की या अपघातात दोन्ही बसच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुरा झाला आहे.

मोठ्या दवाखान्यात बोगस डॉक्टरने महिला पेशंटसोबत केलं नको ते कृत्य; घटना वाचून बसेल धक्का

अपघातानंतर पोलिसांना आणि स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेतली. तातडीने जखमींना कुड्डालोर येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बसचा पुढचा टायर फुटल्याने बसवरील नियंत्रण सुटून हा अपघात घडला अशी प्राथमिक माहिती आली असली तरी या अपघाताचे नेमके कारण अजूनही समोर आले नाही.

अभिनेत्री रश्मिका मंदानाला मोठा धक्का, झाली तब्बल ८० लाख रुपयांची फसवणूक; एकदम जवळच्या विश्वासू व्यक्तीने केली फसवणूक

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *