शेतकऱ्याने दोन एकर कोथिंबिरीत फिरवला रोटर; दर घसरल्याने शेतकरी चिंतेत

A farmer turns a rotor in two acres of coriander; Farmers worried due to fall in prices

कांदा, टोमॅटो पाठोपाठ आता बाजारात कोथिंबिरीचे सुद्धा भाव घसरले आहेत. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. दरम्यान याआधी कांद्याचे व टोमॅटोचे दर घसरल्याने निराश झालेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो व कांदा फेकून दिल्याच्या घटना घडल्या आहेत. याचप्रमाणे हवेली तालुक्यातील भवरापूर येथील शेतकऱ्याने चक्क दोन एकर क्षेत्रातील कोथिंबिरीवर ( Cilantro) रोटर फिरवला आहे. काळूराम चौधरी असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

“मी गॅंगस्टर होईल असा स्वप्नातही विचार…”, लॉरेन्स बिश्नोईने केला मोठा खुलासा

कोथिंबिरिला योग्य दर मिळत नसल्याने या शेतकऱ्याने हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी कोथिंबिरीचे वाढलेले दर पाहून या शेतकऱ्याने कोथिंबिरीचे पीक घेतले. कमी काळात जास्त उत्पन्न मिळावे यासाठी त्यांनी नांगरणी करून मशागत केली. एवढेच नाही तर सुरुवातीला चार हजार किंमतीचे रासायनिक खत (Chemical Fertilizer) देखील शेतात टाकले.

ऊसतोड मजुरांकडून शेतकऱ्यांची लूट सुरूच! ऊस तोडण्यासाठी करतायेत एकरी 5 ते 7 हजार रुपयांची मागणी

मात्र कोथिंबिरीचे सध्याचे दर पाहता कोथिंबीर लागवडीसाठी केलेला खर्च निघनेही कठीण झाले आहे. यामुळे शेतात किमान खत तरी होईल या उद्देशाने काळूराम चौधरी यांनी दोन एकर कोथिंबिरीच्या पिकावर रोटर फिरवला आहे. दरम्यान राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांची हीच अवस्था आहे. पिकांचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

‘या’ ठिकणी अवघ्या 60 रुपयांत मिळते अनलिमिटेड जेवण; मात्र नासाडी केल्यास भरावा लागतो ‘एवढा’ दंड

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *