मुंबई | अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच तिच्या कपड्यांमुळं चर्चेत असते. अनेकदा तिच्या या फॅशनसेन्समुळे तिला ट्रोल देखील करण्यात येतं. सध्या मात्र ती वेगळ्याच गोष्टीमुळं चर्चेत आली आहे. तिच्याबद्दल उर्फीबद्दल एका मोठ्या अभिनेत्यानं एक धक्कादायक खुलासा केला आहे.
“गोप्या म्हणजे भट्टीच्या तव्यावर बसलेल्या बाबासारखा”, अमोल मिटकरी यांचा गोपीचंद पडळकरांवर हल्लाबोल
उर्फी जावेद मुलगी नसून किन्नर असल्याचा मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. हे वक्तव्य अभिनेता फैजान अन्सारी याने केलं आहे. ही बाब सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे भक्कम पुरावे असल्याचा दावाही त्याने केला आहे. या पुराव्यांना तो लवकरच कोर्टात सादर करणार असल्याचं तो म्हणाला.
मोठी बातमी! श्रीगोंद्यात बनवाट दूध भेसळीचा पर्दाफाश
फैजचा उर्फी जावेदसोबत आधीपासून वाद सुरु आहेत. त्यामुळं एका मुलाखतीत बोलताना फैज म्हणाला मी देशासमोर मोठा खुलासा करणार आहे. उर्फी जावेद मुलगी नसून किन्नर आहे. तिच्यासोबत आधीपासूनच माझा वाद सुरु आहे. हा वाद हायकोर्टात पोहोचला आहे. यावेळी मी किन्नर समाजाच्या प्रमुखांनाही कोर्टात बोलावणार असल्याचंही तो म्हणाला.
हृदय पिळवून टाकणारी घटना! आईने ४ मुलांसह विहिरीत घेतली उडी; नंतर स्वतः बाहेर आली, मात्र मुलांना…
उर्फीशी बोलण्याचा प्रयत्न माझ्या टीमने केला आहे. ती मात्र उद्धटपणे वागली. त्यामुळं तिच्याशी बोलून काही उपयोग नाही. तिला समजवण्याचा मी प्रयत्न केला आहे. ती म्हणते की तिला मुस्लिम समाजाशी काही देणं घेणं नाही. त्यामुळे आता मी तिचं सत्य लवकरच लोकांसमोर आणेन. दरम्यान, या वक्तव्यावर अद्याप उर्फीनं काही प्रतिक्रिया दिली नाही.