
Tomato Rate । नवी दिल्ली : कवडीमोल भावात विकल्या जाणाऱ्या टोमॅटोला (Tomato) यावर्षी चांगले भाव आहेत. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची चांदी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे टोमॅटोमुळे नशीब बदलले आहे. परंतु भाव वाढल्याने (Tomato Price Hike) गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. परिणामी अनेकांच्या ताटातून टोमॅटो गायब झाला आहे. अशातच आता सर्वसामान्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. (Latest Marathi News)
Onion Subsidy । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच मिळणार कांद्याचं अनुदान
कारण टोमॅटोच्या किमतीत कमालीची घसरण (Tomato Price Falls Down) झाली आहे. भाव वाढल्याने केंद्र सरकारने नेपाळमधून टोमॅटो आयात (Tomato import from Nepal) केला होता. आयातीमुळे टोमॅटोचे भाव कमी झाले आहेत. अनेक ठिकाणी टोमॅटोच्या किंमती 100 रुपयांच्या आत होत्या. त्यात आता आणखी घसरण होणार आहे. 20 ऑगस्टपासून नाफेड 40 रुपये प्रति किलो दराने टोमॅटोची विक्री करणार आहे.
दरम्यान, टोमॅटोची आवक वाढली असल्याने उत्तर भारतासह दक्षिणेत सुद्धा टोमॅटोच्या किमतीत घसरण झाली आहे. यामुळे जरी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांना याचा खूप मोठा बसला आहे. येत्या काळातही हे दर आणखी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर हे दर आणखी घसरले तर शेतकऱ्यांवर पुन्हा संकट येऊ शकते.
Mukesh Ambani । अखेर झाली घोषणा! ‘या’ दिवशी जिओचा शेअर करणार बाजारात धमाका
राज्यात यावर्षी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. याचा फटका टोमॅटोला बसला. खास करून उत्तर भारतात याचा मोठा परिणाम झाला, टोमॅटो पिकांचे नुकसान झाल्याने टोमॅटोच्या किमती वाढल्या आहेत. परंतु आता केंद्राच्या निर्णयामुळे हे दर पुन्हा कमी होतील.