गौतमी पाटील राजकारणात प्रवेश करणार? रीलस्टारने केला मोठा खुलासा म्हणाली…

pc facebook

अगदी कमी वेळात गौतमी पाटीलने (Gautami Patil) महाराष्ट्रात मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. गौतमीवर कितीही आरोप झाले तरीही, तिच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या चाहत्यांच्या गर्दीमुळे गौतमी पाटील कित्येकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. दरम्यान, गौतमी पाटील एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

निळू फुलेंच्या मुलीची राजकारणात एन्ट्री; विधानसभेपूर्वीच केला ‘या’ पक्षात प्रवेश

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमीचे महाराष्ट्रात जबरदस्त फॅन फॉलोविंग आहेत. गौतमीचा डान्स आणि वाद हे काही नवीन नाही. राजकारण आणि मनोरंजन सृष्टीचे नाते तसे फार जुने आहे. अनेक मराठीसह हिंदी कलाकारांनी राजकारण प्रवेश केला आहे. अशातच आता रीलस्टार गौतमी राजकारणात प्रवेश करणार, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे.

काळ्या रंगाच्या सफरचंदाची किंमत वाचून व्हाल थक्क ; वाचा सविस्तर

या चर्चेला स्वतः गौतमीने पुर्णविराम दिला आहे. यावर बोलताना गौतमी म्हणाली की, मला राजकारणात कसल्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही. त्यामुळे मी राजकारणात प्रवेश करणार नाही. मी एक कलाकार आहे आणि यापुढेही कला सादर करणार आहे. यानंतर आता गौतमी खरच राजकारण प्रवेश करणार का? असा प्रश्न अजूनही चाहत्यांच्या मनात धुडगूस घालत आहे.

लग्न घटिका समीप आली पण, नवरी मंडपातून बेपत्ता; ‘त्या’ 20 मिनिटात नेमकं काय घडलं?

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *