Site icon e लोकहित | Marathi News

Ritesh-Genelia : “…तुम्ही म्हातारे झाले आहात’ रितेश देशमुखचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत! पाहा VIDEO

"…You have become old" Riteish Deshmukh's 'It' video in discussion! WATCH VIDEO

मुंबई : बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलिया (Genelia) आणि रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) या जोडीला ओळखले जाते. ही जोडी सोशल मीडियावर कायम कोणत्या या कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. हे दोघेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. चाहत्यांसाठी रितेश हा कायम त्याच्या इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. नुकतंच रितेशने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

रितेशने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दोघेही मस्ती करताना दिसत आहेत. यावेळी रितेश म्हणतो, “जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या पत्नीच्या प्रेमात पडता, तेव्हा समजून जा की तुम्ही म्हातारे झाले आहात.” यावर जिनिलियाही फारच हटके प्रतिक्रिया देताना दिसत आहे.

रितेशचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यावर एका युजरने कमेंट करत लिहिले की,वहिनींना तुमच्यावर उलट प्रेम होत आहे. अशाच अनेक मजेशीर कमेंट या व्हिडीओवर येत आहेत.

Spread the love
Exit mobile version