Site icon e लोकहित | Marathi News

Amruta Fadnavis : “ये दोस्ती हम नही तोड़ेंगे” फ्रेंडशिप दिनी अमृता फडणवीसांचे ‘ते’ ट्विट चर्चेत

"Yeh dosti hum nahi todenge" Amrita Fadnavis' 'that' tweet on Friendship Day is in discussion

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अमृता फडणवीस सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांच्या काही पोस्टमुळे, वक्तव्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात. आज फ्रेंडशिपडेच्या निमित्ताने त्यांनी ट्वीटर अकाउंटवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

अमृता फडणवीसांनी ट्विटरवर फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, “ये दोस्ती हम नही तोड़ेंगे” असं म्हटलं आहे. “महाराष्ट्राच्या दोन अनमोल रत्नांसोबत” त्याचबरोबर या ट्वीटमध्ये अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं असून #FriendshipDay2022 हा हॅशटॅग वापरला आहे.

सध्या हे ट्विट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. अमृता फडणवीस यांच्या ट्वीटनंतर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. काहींनी यासाठी अमृता फडणवीसांना ट्रोल देखील केले.

Spread the love
Exit mobile version