
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंह यांच्याविरोधात मागील काही महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. महिला कुस्तीपटूंनी (Woman Wrestelers) ब्रिजभूषण शरणसिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला असून त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केली आहे. यासाठी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी काल (ता.३०) थेट हरिद्वार येथे गंगा नदीमध्ये पदके विसर्जित करण्याचा निर्धार केला होता. मात्र भारतीय किसान युनियनचे (BKU) अध्यक्ष नरेश टिकैत यांनी त्यांची समजूत काढली.
यानंतर महिला कुस्तीपटूंनी माघार घेतली. दरम्यान या कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावरील कारवाईसाठी केंद्र सरकारला (Central Government) पाच दिवसांची मुदत दिली आहे. या काळात कारवाई केली नाही तर पदके गंगार्पण केली जातील असा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका करताना नरेश टिकैत म्हणाले की,” ही मान- सन्मानाची गोष्ट आहे. तसेच हे प्रकरण लैंगिक शोषणाशी संबंधित आहे. सरकार एका व्यक्तीला वाचविण्यासाठी प्रयत्न करत असेल तर ती शरमेची बाब आहे असे म्हणावे लागेल. आम्ही खेळाडूंची मान शरमेने खाली झुकू देणार नाही.”
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला 12 हजार
महत्त्वाची बाब म्हणजे या कुस्तीपटूंनी त्यांची पदके गंगेत टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर, काँग्रेस पक्षाने सुद्धा त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला होता. याआधी नव्या संसद भवनाच्या उद्घाटनादिवशी दिल्लीतील जंतरमंतर येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना हटविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला होता. या कारवाईनंतर संतापलेल्या कुस्तीपटूंनी आपली पदके गंगेमध्ये फेकून देण्याची घोषणा केली होती.
गौतमी पाटील राजकारणात प्रवेश करणार? रीलस्टारने केला मोठा खुलासा म्हणाली…
‘‘आम्ही मिळवलेली पदके आमचा जीव की प्राण आहेत. मात्र आम्ही त्यांना गंगेमध्ये टाकणार आहोत. आता पदकेच गेल्यानंतर आम्ही जिवंत राहण्याचे काही कारण दिसत नाही त्यामुळे आम्ही इंडिया गेट येथे आमरण उपोषण करणार आहोत.’’ असे साक्षी मलिकने म्हंटले होते. दरम्यान विनेश फोगटनेही त्याचे समर्थन केले होते.
साहिलने हातात बांधलेल्या त्या दोऱ्याबद्दल समोर आलं ‘हे’ सत्य; पोलीसांचा अधिक तपास सुरू