Site icon e लोकहित | Marathi News

‘महिलांनो दोनच अपत्यावर थांबा, उगाच पलटण वाढवू नका’; अजित पवारांचे वक्तव्य चर्चेत

'Women, stop at two children, don't increase the platoon too much'; Ajit Pawar's statement in discussion

अजित पवारांनी (Ajit Pawar) सध्या एक आगळंवेगळं वक्तव्य केलं आहे. “दोनच अपत्यांवर थांबा, जास्त पलटण वाढवू नका, वंशाच्या दिव्याच्या पाठीमागे लागू नका” असा सल्ला अजित पवार यांनी महिलांना दिलाय. ते बारामती (Baramati) येथे एका भाषणात बोलत होते. त्यांच्या वक्तव्याची आता सगळीकडे जोरदार चर्चा चालू आहे.

बिग ब्रेकिंग! किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल

गरजू महिलांना स्वेटर वाटण्याचा कार्यक्रम बारामती या ठिकाणी होता. यावेळी भाषणात बोलताना अजित पवार म्हणाले, “आपल्या मुलीला आणि सूनला दोनच अपत्यावर थांबण्याचा सल्ला द्या. उगाच वंशाचा दिवा म्हणून कुटुंब वाढवू नका” असा सल्ला यावेळी बोलताना त्यांनी महिलांना दिला आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे पुन्हा गैरहजर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

दरम्यान, अजित पवारांनी महिलांना शरद पवार यांचं उदाहरणं दिलं. शरद पवार साहेब यांनी सुद्धा जास्त मुलं होऊ दिली माहिती ते सुद्धा एकाच अपत्यावर थांबले. म्हणून दोन पेक्षा जास्त अपत्य होऊ देऊ नका असं अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.

महाराष्ट्र केसरी जिंकताच शेतकरीपुत्र शिवराजसाठी समोर आली मोठी गुडन्यूज

Spread the love
Exit mobile version