Site icon e लोकहित | Marathi News

Prajakta Mali: “वर्षा बंगल्यावरवर यायला जमेल का? असा फोन आला अन्….”, प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

"Will Varsha be able to come to the bungalow? I got a call and...", Prajakta Mali's 'She' post is in discussion

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ या सुप्रासिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. आता नुकतंच प्राजक्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरील एक पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमुळे सध्या प्राजक्ता चांगलीच चर्चेत आहे.

ड्रॅगन फ्रुट,किवीसारख्या विदेशी फळांची करा लागवड, ‘या’ योजनेअंतर्गत मिळेल अनुदान

प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्रामवरून मुख्यमंत्र्याच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर केले आहेत आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, “वर्षा बंगल्याविषयी पहिल्यापासूनच जाम कुतूहल वाटत आलयं…अर्थातच, महाराष्ट्रातल्या महत्वाच्या वास्तूंपैकी ती एक वास्तू आहे…परवा मुख्यमंत्री कार्यालयातून गणेश दर्शनाला आणि स्नेहभोजनाला वर्षावर यायला जमेल का? असा फोन आल्यावर खूप आनंद झाला…आम्हासारख्या कलाकारांना घरी बोलावून मान दिल्याबद्दल व आदरातिथ्य केल्याबद्ददल मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे, मा. श्रीकांतजी शिंदे सरांचे व परिवाराचे मनापासून आभार…”.

प्राजक्ताची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान मागच्या काही दिवसांपासून ती रानबाजार या वेबसीरिजमुळेचांगलीच चर्चेत आली होती.

Bjp: दिंडोशीमध्ये गणेश विसर्जनाच्यावेळी भाजपच्या दोन गटांमध्ये झाला तुफान राढा

Spread the love
Exit mobile version