
MLA Disqualification Case । मुंबई : राज्याचे मागील काही दिवसांपासून वातावरण तापले आहे. शिवसेनेच्या (Shivsena) आमदार अपात्रतेचा निकाल अजूनही प्रलंबित आहे. त्यामुळे शिवसेनेचे ते आमदार अपात्र होणार का? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. काल सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना कडक शब्दात फटकारले होते. यावर आता राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (Latest Marathi News)
Satara Accident । पुणे–बंगळूर महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 3 जागीच ठार
राहुल नार्वेकर म्हणाले की, “वेळापत्रकाबाबतचा निर्णय योग्य तो कायदेशीर सल्ला घेतला जाईल. वेळापत्रक तयार करून तो दोन महिन्यात निर्णय द्यावा, असा कोणता आदेश दिला नाही. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश ऑनलाइन उपलब्ध असून त्यामध्ये नोटीस जारी करण्याचा मुद्दा देण्यात आला आहे. केवळ दोन महिन्यात निकाल द्या किंवा इतक्या दिवसात वेळापत्रक द्या असे कुठंही म्हटलं नाही.”
Maratha Reservation । “छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे एकाच बाजारातले,” मनोज जरांगेंची जहरी टीका
“तसेच ज्या व्यक्तीला सद्य लोकशाहीवर विश्वास आहे. तो निश्चितपणे संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांचा मान ठेवू शकेल. पण माझा संविधानावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा आणि न्यायालयाचा मान राखणं हे माझं कर्तव्य आहे. ते मी पार पाडणार आहे”, असे नार्वेकर म्हणाले आहेत.