
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राहुल गांधी यांना मोठा धक्का बसल्याचे समजले जात आहे. सुरत कोर्टाने राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांना मानहानी प्रकरणात दोषी ठरवले असून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर त्यांना जामीन देखील मंजूर झाला. मात्र दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यामुळे राहुल गांधींसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होताच अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
आता यानंतर राहुल गांधी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवू शकणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. पाहा याबाबत कायदा नक्की काय सांगतो
लोकप्रतिनिधी कायद्यात अपात्रतेबाबत तरतूद आहे. लोकप्रतिनिधी अधिनियम कायद्याच्या कलम 8(3) मध्ये असे नमूद केले आहे की जर एखाद्या व्यक्तीला दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आणि शिक्षा भोगल्यानंतर देखील त्या व्यक्तीला सहा वर्षांपर्यंत निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे राहुल गांधींसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
“… हा आपल्या देशात गुन्हा ठरलाय”, राहुल गांधींची खासदारकी जाताच उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया