Site icon e लोकहित | Marathi News

शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही – देवेंद्र फडणवीस

Will not allow injustice to farmers - Devendra Fadnavis

कापसाला कमी दर मिळत असल्याने राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी विधान सभेच्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावात शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. हमी भावापेक्षा कमी दरात कापसाची खरेदी होत असेल तर शासन मध्यस्थी करून अधिकची केंद्र तयार करेल असे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे.

मोठी बातमी! सोलापूरमधल्या बार्शीत फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट

याशिवाय राज्य सरकारने ( State Governmemt) मंत्रिमंडळ गुंतवणूक समितीच्या दोन बैठका घेतल्या आहेत. या माध्यमातून राज्यात 95 हजार कोटी रूपयांच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. यामार्फत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. मागील पाच महिन्यात नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना 6195 कोटी रूपये दिले आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मोठी बातमी! केशवराव धोंडगे यांचं निधन; वयाच्या १०२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

259 अन्वये मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावात मांडण्यात आलेल्या महत्त्वाच्या बाबी :

1) महापुरुषांचा अवमान कोणीही करू नये म्हणून महापुरूषाच्या अवमानाबाबत एक समिती नेमण्यात येणार आहे.
2) सेक्सटॉर्शन ( Sextortion) आणि अवैध धंद्या संदर्भात गुन्हे, रॅकेटला चाप बसावा, यासाठी कायद्यात काही कलमे घालण्याचा राज्य शासन विचार करत आहे.
3) सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर क्राईम् फ्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार आहेत.
4) पुढच्या वर्षीपासून पीक नुकसानीची संपूर्ण पाहणी उपग्रह आधारित करण्यात येणार आहे.
5) आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात धान्य ऐवजी थेट हस्तांतरणा ने मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शिंदे-ठाकरे एकत्र येणार?, शिंदे गटातील ‘या’ नेत्याचा मोठा खुलासा

Spread the love
Exit mobile version