Site icon e लोकहित | Marathi News

‘मविआ’च्या उद्याच्या सभेला अजित पवार गैरहजर राहणार? नाराजीच्या चर्चांना पुन्हा उधाण

Will Ajit Pawar be absent from tomorrow's meeting of 'Mavia'? Rekindle the discussions of displeasure

राजकीय वर्तुळात सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. दरम्यान महाविकास आघाडीने नागपूर येथे वज्रमूठ सभेचे आयोजन केले आहे. महाविकास आघाडीने पहिल्यांदाच नागपुरात सभेचे आयोजन केले आहे. उद्या नागपूर या ठिकाणी ही सभा पार पडणार आहे. महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेते या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत . मात्र अजित पवारांच्या उपस्थितीबाबत संभ्रम निर्माण झालाय. याबाबत एका वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

पीएम किसान सन्मान निधीचे नियम बदलले, शेतकऱ्यांनो ‘हे’ काम पूर्ण केलं तरच मिळेल पुढील हप्ता; जाणून घ्या..

याआधी छत्रपती संभाजीनगर ( Sambhajinagar) येथे झालेल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांना मोठी खुर्ची देण्यात आली होती. ही खुर्ची इतर नेत्यांना देण्यात आलेल्या खुर्चीपेक्षा वेगळी होती. यामुळे महाविकास आघाडी मधील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. म्हणून नागपूरच्या वज्रमूठ सभेत (Vajramuth Meeting) सर्वाना सारख्या खुर्च्या असणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

खोपोलीच्या अपघाताबाबत जखमी प्रवाशांनी मुख्यमंत्र्यांना सांगितली धक्कादायक माहिती!

यावेळी नाना पटोले म्हणाले की, “या सभेत प्रत्येक पक्षातील दोन नेत्यांना बोलण्याची संधी मिळणार आहे. काही नेते कर्नाटकात गेले आहेत. त्यामुळे सर्वच नेते येतील असे नाही. मला सुरतला महत्त्वाचे काम होते त्यामुळे मी संभाजीनगरच्या सभेला अनुपस्थित होतो. नागपुरातील वज्रमूठ सभा जोरात होणार आहे”.

भाजप राष्ट्रवादी फोडणार? संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Spread the love
Exit mobile version