
मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. प्रिया बेर्डे यांनी ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. दरम्यान, मागच्या काही दिवसापूर्वी प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसला (Congress) रामराम ठोकला. त्यांनतर प्रिया बेर्डे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरे अचानक शरद पवारांच्या भेटीला रवाना; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केल्यांनतर कोणतिही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्रआता त्यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना याबाबत भाष्य केलं आहे. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करताना खूपच मर्यादा होत्या. भाजपात मला काम करण्याचा स्पेस मिळाला. त्यामुळे मी भाजपात प्रवेश केला असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप आघाडीबाबत शरद पवारांचे वक्तव्य; म्हणाले….
त्याचबरोबर पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “आत्तापर्यंत सांस्कृतिक विभाग दुर्लक्षित असून त्याला फक्त प्रचारापुरतंच गृहित धरलं जायचं. मात्र आता असं होणार नाही प्रत्येक कलाकाराला न्याय मिळेल असं प्रिया बेर्डे यावेळी म्हणाल्या आहेत. सध्या त्यांच्या वक्तव्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे.
अशोक सराफ यांचा लहान भाऊ करतो ‘हे’ काम; ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
दरम्यान, प्रिया यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत 7 जुलै 2020 मध्ये काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. यानंतर अवघ्या 2 वर्षात प्रिया यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसला सोडचिठ्ठी दिली.
श्रद्धा वालकर प्रकरणात समोर आली मोठी अपडेट, वडील गंभीर आरोप करत म्हणाले…