Site icon e लोकहित | Marathi News

जेथे शिवसेनेचा खासदार, ती जागा शिवसेनाच लढवणार; श्रीकांत शिंदे यांची माहिती

Where Shiv Sena MP, Shiv Sena will contest that seat; Information from Srikant Shinde

कल्याण- पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील ४८ जागांवर सर्व पक्षांकडून तयारी चालू असल्याचे दिसत आहे. नुकतीच काँग्रेसने राज्यातील लोकसभेच्या सर्व जागांबाबत आढावा बैठक घेतली आहे. तर राष्ट्रवादीतून देखील लोकसभेची तयारी चालू आहे. भाजपनेही राज्यात ‘मिशन 45’ ही लोकसभेच्या निवडणुकीसाठी मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. अशातच शिवसेनेच्या शिंदे गटाकडून देखील लोकसभेच्या तयारीचे संकेत देण्यात आले आहेत.

भीषण अपघात! कोंबड्या वाहून नेणाऱ्या दोन पिकअपची एकमेकांना जोरदार धडक

भाजपाने राज्यातील लक्ष केलेल्या ४५ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी वेगवेगळ्या राष्ट्रीय नेत्यांवर दिली आहे. त्या ४५ लोकसभा मतदारसंघांमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर या मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांचे ऑक्टोबर महिन्यात या मतदारसंघात दोन दौरे होणार आहेत.

अजित पवारांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊत यांनी केली दिलगिरी व्यक्त; म्हणाले…

कल्याण लोकसभा मतदार संघात अनुराग ठाकूर यांचे दौरे होणार आहेत. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपाचा डोळा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. परंतु या चर्चेला श्रीकांत शिंदे यांच्याकडून पूर्णविराम देण्यात आला. ज्या मतदारसंघात शिवसेनेचा खासदार आहे. ती जागा शिवसेनाच लढणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

ब्रेकिंग! ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन, सिनेसृष्टीत शाेककळा

श्रीकांत शिंदे म्हणाले, भाजप नेत्यांना केंद्रांकडून लोकसभेच्या मतदारसंघाचे दौरे देण्यात आले आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे आम्हाला कासलाचा त्रास नाही. भाजप त्यांच्या पक्षाची संघटना बांधत आहे. प्रत्येक पक्षाला तो अधिकार आहे. ज्या मतदारसंघात शिवसेनेचा खासदार आहे. ती जागा शिवसेना लढवणार आहे. त्यामुळे कोणीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, असे त्यांनी सांगितले.

पुण्यात पावसाला जोरदार सुरुवात; पावसामुळे झाली वाहतूक कोंडी

Spread the love
Exit mobile version