असं काय घडलं की पुण्यात टोमॅटोवरुन भाजी विक्रेता आणि ग्राहकामध्ये फ्री स्टाईल हाणामारी

What happened was that a freestyle brawl broke out between a vegetable seller and a customer over tomatoes in Pune

पुणे | एकेकाळी कवडीमोल भावात विकल्या जाणाऱ्या टोमॅटोला (Tomato) आता चांगले दिवस आले आहेत. टोमॅटोने शंभरी पार केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) महागाईच्या काळात काहीसा दिलासा मिळाला आहे. प्रत्येक स्वयंपाकघरात टोमॅटोची चर्चा आहे. याचा सर्वसामान्य लोकांच्या महिन्याच्या बजेटवर परिणाम झाला आहे. त्यांना पूर्वीपेक्षा जास्त किमतीत टोमॅटो खरेदी करावा लागत आहे. मात्र पुण्यात काहीसा वेगळा प्रकार घडला आहे. (Latest Marathi News Pune)

Sharad Pawar । ‘शरद पवार सैतान, या सैतानाला पाप फेडावे लागत आहे’, ‘या’ बड्या नेत्याची जहरी टीका

पुणे शहरामधील वडगाव शेरी भागात राहणारे गोपाल ढेपे हे भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाजारात गेले होते. त्यांनी भाजी विक्रेते अनिल गायकवाड यांना टोमॅटोचा भाव विचारला असता गायकवाड यांनी टोमॅटो २० रुपयाला पावशेर आहे असे सांगितले. त्यावरुन अनिल गायकवाड यांनी आपणास शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केली असल्याची तक्रार ढेपे यांनी चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये दिली. त्यावरून गायकवाड यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पावसाअभावी शेतकऱ्यावर घोंगावतंय दुबार पेरणीचं संकट! सरकारकडून मदत जाहीर करण्यात यावी; ‘या’ नेत्याची मागणी

दरम्यान, टोमॅटोवरुन भाजी विक्रेता आणि ग्राहकात हाणामारी झाल्याची चर्चा शहरात चांगलीच रंगू लागली आहे. कल्याणमधील एका भावाने आपल्या बहिणीला वाढदिवसादिवशी चक्क टोमॅटो भेट दिला होता. या घटनेची चर्चा देशभरात झाली होती.

PM Kisan Yojana । फक्त एक चूक आणि तुम्हालाही घेता येणार नाही किसान योजनेचा लाभ, अर्जावेळी टाळा ‘या’ चुका

Spread the love