Site icon e लोकहित | Marathi News

काय सांगता? ‘या’ गावात चक्क माकडांच्या नावावर आहे 32 एकर जमीन

what do you say There is 32 acres of land in the name of monkeys in this village

आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण पाहत असतो की भावकी, भाऊ-बहीण किंवा शेतीच्या (agriculture) बांदावरून मोठ्या प्रमाणात वाद झाल्याचे पाहायला मिळतात. दरम्यान अशातच महाराष्ट्रातील उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील उपला गावात अस एक प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. हे प्रकरण म्हणजे उपला गावात ग्रामपंचायतीमध्ये जमिनीच्या नोंदीनुसार गावात राहणाऱ्या सर्व माकडांच्या (Monkey) नावावर 32 एकर जमीन (32 acres of land) करण्यात आलीय.

‘या’ जिल्ह्यातील दोन तरुणांनी यूट्यूबवरुन घेतले शेतीचे ज्ञान, वर्षातच घेतायत लाखोंचे उत्पादन

या गावात माकडांबद्दल (Monkey) इतका आदर आहे की लग्नसमारंभात वऱ्हाडींच्या आधी माकडांना जेवण दिलं जाते. हे गाव माकडांच्या आदरातिथ्यामुळे खूप चर्चेत आहे. तसेच या गावातील लोक माकडांना विशेष मान देतात. या गावात माकडे दारात आल्यावर त्यांना अन्नदान केले जाते. तसेच काही वेळा विवाह सोहळा सुरू करण्यापूर्वी माकडांचा सन्मान केला जातो.

सर्वांच्या एकीची ताकद बिबी गावामधे मध्ये पाहायला मिळाली

उपळा गावचे सरपंच बप्पा पडवळ यांनी एका मुलाखतीती सांगितले की, “जमिनी माकडांच्या मालकीची असल्याचे कागदपत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय पण या प्राण्यांसाठी ही तरतूद कोणी केली आणि कधी केली हे माहीत नाही. “पुढे बोलताना पडवळ म्हणाले की, “पूर्वी गावात केल्या जाणाऱ्या सर्व विधींमध्ये माकडांची उपस्थिती होती. दरम्यान गावात आता जवळपास 100 माकडे आहेत. विशेष म्हणजे ही सर्व एकाच ठिकाणी जास्त काळ थांबत नसल्याने त्यांची संख्या गेल्या काही वर्षांत कमी होत आहे. म्हणून त्या जमिनीवर वनविभागाने वृक्षारोपण केले आहे. याआधी त्या जागेवर घर होते, ते आता कोसळले” असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी शेतातच केलं अर्धनग्न आंदोलन, केली ‘ही ‘ मागणी

Spread the love
Exit mobile version