
मुंबई : ‘बिग बॉस’ (Big Boss) हा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम कायम चर्चेत असतो. या कार्यक्रमाचं सोळावं पर्व नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. यंदाच्या पर्वात अब्दु रोजिकने (Abdu Rojik) हजेरी लावली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात अब्दुची चर्चा होताना दिसत आहे. अब्दू हा केवळ १९ वर्षांचा असून तो कोट्वयावधी संपत्तीचा मालक आहे.
मोठी बातमी! ठाण्यातील अवजड वाहतूक उद्यापासून बंद
युट्यूबर (YouTube) अब्दु रोजिक देखील आता ‘बिग बॉस 16’मध्ये सहभागी झाला आहे. अब्दुचा सोशल मीडियावर चाहतावर्ग खूप मोठ्या प्रमाणावर आहे. सोशल मीडियावर त्याचे जवळपास 3.9 मिलीयन फॉलोअर्स आहेत. अब्दु गायक असून एक चांगला ब्लॉगर आणि बॉक्सरदेखील आहे. माहितीनुसार, तो कोट्यवधींचा मालक आहे. युट्युब चॅनेलवर गाण्यासोबत तो रिल्स देखील बनवतो. त्यामुळे त्याच्या कमाईत चांगलीच भर पडते.
दरम्यान, ‘ओह दिली जोर’ या गाण्यामुळे अब्दु रातोरात फेमस झाला. तो त्याचे टिक टॉकवर देखील अनेक व्हिडीओ बनवायचा. त्याच्या प्रत्येत गाण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत असायचे. तो सध्या ‘बिग बॉस 16’मुळे घराघरांत पोहोचलाय.
नवरात्रीत गरबा खेळताना हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यूंमध्ये वाढ, आत्तापर्यंत सहा युवकांचा मृत्यू