Site icon e लोकहित | Marathi News

साईबाबांच्या दर्शनाला जाताना आता मास्क वापरणे सक्तीचे: साई संस्थानचं आवाहन

Wearing mask while visiting Sai Baba is now mandatory: Sai Sansthan's appeal

शिर्डी : मागच्या दोन वर्षांपासून कोरोनाने (Corona) थैमान घातल आहे. आत्ता कुठेतरी हे वातावरण शांत झालेलं होत. पण पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे. चीन, अमेरिका, ब्राझील आणि जपानमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. माहितीनुसार, देशामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 131 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्शवभूमीवर शिर्डीतल्या साईबाबा संस्थाननेही सतर्कतेचे उपाय सुरु केले आहेत. साईबाबांच्या दर्शनाला येणार्‍या भक्तांनी आता मास्क लावून दर्शनाला यावे असे साईबाबा संस्थानने आवाहन केलं आहे.

डिसेंबर नंतर सुद्धा गरिबांना मोफत रेशन मिळणार का? केंद्रीय मंत्र्यांनी दिली महत्वाची अपडेट

शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनाला येणार्‍या भक्तांनी मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, त्याचबरोबर सोशल डिस्टनसिंगचा वापर करावा. ज्या लोकांनी बूस्टर डोस घेतले नसतील अशा लोकांनी लवकरात लवकर बूस्टर डोस घ्यावेत.

“मी भाषण करत नव्हतो”, निलंबनानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय त्यामुळे तो रोखण्यासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहनसाई देखील संस्थानचे प्रभारी कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.

मोठी बातमी! जयंत पाटील यांचे निलंबन

Spread the love
Exit mobile version