
मुंबई : आपण पाहतो बऱ्याचदा काही लोकांना धुळीची (dust) अलर्जी (Allergies)असते .या लोकांमध्ये जास्त करून महिलांचे प्रमाण जास्त असते. महिलांनी अगदी घरात झाडू जरी मारला तरी त्यांना काही सेकंदात शिंका (sneeze) यायला सुरुवात होते आणि सर्दी (cold)होते. बऱ्याचदा काहीजनांना धुळीमुळे डोळे लाल होतात किंवा हातापायांवर पूरळ देखील येतात तर काहींना श्वास घेण्यास देखील होतो. या धुळीच्या अलर्जीपासून बचाव करण्यासाठी बरेचजण वेगळ्या पद्धतीचे उपाय अवलंबतात. पण या उपायांमुळे पाहिजे तेवढा फरक यामध्ये दिसून येत नाही. परंतु असे काही घरगुती उपाय आहेत. ज्यांच्या मदतीने तुम्ही धुळीच्या अलर्जी पासून मुक्ती मिळवू शकता.
1)आहाराममध्ये दही व ताक- आहारामध्ये दही, ताक व चीज यासारख्या पदार्थांचा समावेश करा. कारण यामध्ये सर्व प्रोबायोटिक्स आहेत. त्यामुळे तुम्हाला धुळीपासून होणाऱ्या अलार्जीपासून आराम मिळू शकतो. आहारामध्ये दही, ताक व चीज या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते व धुळीच्या अलर्जीचा त्रास सहजासहजी होत नाही.
2) मधाचा वापर- धुळीच्या अलर्जीमुळे मुक्तता मिळवण्यासाठी मधाचे सेवन खूप उपयुक्त ठरू शकते. पण हे मध जैविक पद्धतीने वापरून तयार केलेले असावे.जर तुम्हाला सतत धुळीमुळे शिंका किंवा खोकला यायला लागला तर दिवसातून तीन वेळा एक लहान चमचा मधाचे सेवन करणे गरजेचे आहे. ऍलर्जीमुळे हात पायांवर पुरळ किंवा खाज सुटत असेल तर अशा भागावर मधाचा पातळ थर लावावा.
Central Govt: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! तांदळाची निर्यात बंद; सर्वसामान्यांवर काय परिणाम?
3) निलगिरी तेल- जर तुम्हाला धुळीची अलर्जी होत असेल तर तुम्ही निलगिरीचे तेल हे गरम पाण्यामध्ये टाकून त्याची वाफ घ्या. यामुळे तुम्हाला धुळीच्या अलर्जीमुळे उद्भवणारे सर्दी व खोकला पासून त्वरित आराम मिळतो.
4) पेपरमिंट घालून केलेला चहा- सगळ्यांना चहा तर आवडतोच पण जर पेपरमिंट घालून केलेला चहा तुम्ही प्या. यामुळे तुम्हाला ऍलर्जीमुळे जर सर्दी खोकला झाला तर त्यावर हे अतिशय गुणकारी आहे. या समस्येवर हा चहा चांगला उपाय आहे. आता हा चहा बनवण्यासाठी पेपरमिंटची वाळलेली पाने 250 मिली लिटर पाण्यामध्ये चांगली उकळून घ्या. दरम्यान त्या नंतर या तयार काढ्याचे सेवन दिवसातून थोडे थोडे सतत करीत राहावे.
5) ग्रीन टी- बरेच लोक ग्रीन टीचे सेवन वजन कमी करण्यासाठी करतात. पण याचा अजून एक गुणकारी फायदा आहे. ग्रीन टी मध्ये अँटिऑक्सिडंट असल्यामुळे शरीरामध्ये एलर्जीची होणाऱ्या रिॲक्शन रोखण्यास मदत मिळते. त्यासोबतच ऍलर्जीमुळे त्वचेवर येणारी लाली किंवा सुटणारी खाज ग्रीन टी च्या वापराने कमी होते.