Site icon e लोकहित | Marathi News

वंचित बहुजन आघाडी व शिवसेना एकत्र येणार? प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्हॅलेंटाईन डे पर्यंत काहीही… “

Vanchit Bahujan Aghadi and Shiv Sena will come together? Prakash Ambedkar said, "Anything till Valentine's Day..."

एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या धक्क्यानंतर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी शिवसेनेकडून महाप्रबोधन यात्रेचे देखील आयोजन करण्यात आले होते. दरम्यान मागील काही महिन्यांपासून शिवसेना व वंचित बहुजन आघाडी ( Shivsena & VBA) यांच्या युतीच्या चर्चा होत आहेत. प्रकाश आंबेडकर व उद्धव ठाकरे यांची याबाबत बैठक देखील पार पडली होती.

शेतकऱ्यांना लग्नासाठी मुलगी मिळणे मुश्किल; केंद्रीय मूल्य आयोगाच्या बैठकीत शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर ( Prakash Aambedkar) यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. ” आमचे शिवसेनेवर लाईन मारण्याचे काम सुरु आहे, त्यामुळे व्हॅलेंटाईन डे पर्यंत काहीही होवू शकते” असे मिश्किल वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. यामुळे उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांच्या युतीच्या चर्चा जोरदार सुरू आहेत.

शिक्षकाकडून विद्यार्थ्यांला लाथा बुक्क्यांनी मारहाण; व्हिडीओ होतोय व्हायरल

नाशिक विधानपरिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत वंचितचे उमेदवार रतन बनसोडे उभे आहेत. त्यांच्या प्रचारा दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबतच्या युतीवर भाष्य केले आहे. यावेळी ते म्हणाले की, “आमची फक्त शिवसेनेसोबत एकत्र येण्याची बोलणी सुरू आहे, मात्र आपण काँगेस आणि राष्ट्रवादीला देखील सोबत घेऊ, असे उद्धव ठाकरेंचे मत आहे.”

साखरपुडा अनंत अंबानीचा मात्र चर्चा ऐश्वर्या राय बच्चनच्या लेकीची

Spread the love
Exit mobile version