Site icon e लोकहित | Marathi News

स्मार्टफोन वापरताय? मग ऐकाच, गुगलने प्ले स्टोअर वरून हटवल्या ‘या’ 16 अ‍ॅप्स; कारण…

Using a smartphone? Then listen, Google removed these 16 apps from the Play Store; Because…

तुम्ही स्मार्टफोन (smartphone users) वापरत असाल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा. कारण गुगलने (Google) प्ले स्टोअर (Play Store) वरून 16 अ‍ॅप्स काढून टाकले आहेत. अ‍ॅप्स काढून टाकण्याचे कारण म्हणजे या अ‍ॅप्स वापरल्यामुळे वापरकर्त्यांच्या मोबाईलची कमी वेळात बॅटरी संपणे आणि जास्त डेटाचा वापर वाढणे या प्रकारची हानी होत होती.

‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार कुसुम सोलर पंप, ‘असा’ करा अर्ज

महत्वाची बाब म्हणजे सिक्युरिटी कंपनीच्या अहवालानुसार, या 16 अ‍ॅप्स वापरताना जाहिराती मोठ्या प्रमाणात यायच्या. दरम्यान या जाहिरातींवर क्लिक केल्यामुळे फसवणूक झाल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर जाहिरातींवर क्लिक केल्यावर दुसरेच
वेबपेज उघडले जात होते. त्यामुळे युजर्सच्या मोबाईलची बॅटरी आणि डेटा यांचा अधिक वापर होत होता. म्हणून या 16 अ‍ॅप्स गूगल प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यापूर्वी त्यांची एकूण 20 लाख इंस्टॉलेशन्स होती.

खुशखबर! आता ‘या’ नागरिकांना एस-टी मध्ये करता येणार विना टिकिट मोफत प्रवास

दरम्यान, आर्स टेकनियाने (Ars Technica) दिलेल्या अहवालानुसार, गुगलने (Google) प्ले स्टोअर (Play Store) वरून 16 अ‍ॅप्लिकेशन काढून टाकले आहेत, जे McAfee ने शोधले होते. इतकंच नाही तर अँड्रॉइड, स्मार्टफोन्स आणि टॅब्लेटवर या डीव्हाइसवर ॲप डाउनलोड करण्यासाठी पूर्वी उपलब्ध असलेले अ‍ॅप्स युटिलिटी अ‍ॅप्लिकेशन्स म्हणून ओळखे जात होते. म्हणून हे अ‍ॅप्स वापरकर्त्यांना टॉर्चच्या रूपात डिव्हाइसची फ्लॅश चालू करण्यासाठी तसेच QR कोड स्कॅन करण्यास वापरले जात होते.

खुशखबर! आता ‘या’ नागरिकांना एस-टी मध्ये करता येणार विना टिकिट मोफत प्रवास

या 16 ॲप्स टाकल्या काढून

महत्वाची बाब म्हणजे काढून टाकलेल्या अ‍ॅप्लिकेशन्सच्या यादीमध्ये BusanBus, Joycode, Currency Converter, High-Speed Camera, Smart Task Manager, Flashlight+, K-Dictionary, Quick Note, EzDica, Instagram Profile Downloader आणि Ez Notes यांसारख्या ‘युटिलिटी’ अ‍ॅप्सचा समावेश आहे.

जगातील सर्वात घाणेरडा व्यक्ती माहिती आहे का? 50 वर्षांपासून केली नव्हती अंघोळ; पाहा PHOTO

Spread the love
Exit mobile version