
मुंबई : उर्फी जावेद सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती अनेकदा तिच्या ड्रेसिंग सेन्सने काहीतरी नवीन करत राहते. आपल्या फॅशन आणि स्टाइलमुळे चर्चेत आलेली उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती रोज काही ना काही गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिचे व्हिडिओ आणि फोटो इंटरनेटवर येताच व्हायरल होतात.
उर्फीच्या ड्रेसिंग सेन्समुळे तिला अनेकदा ट्रोलिंगला बळी पडावे लागले आहे. मात्र, असे असूनही उर्फी लोकांची पर्वा न करता तिच्या मनाप्रमाणे कपडे परिधान करते. याच क्रमात उर्फीने नुकताच इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी पुन्हा एकदा बोल्ड अंदाजात दिसली. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये उर्फीने आपले संपूर्ण शरीर हिरव्या रंगाच्या वायरने गुंडाळले आहे. यासोबतच उर्फीने तिच्या गळ्यात मॅचिंग हिरवा चोकर घातला होता आणि केसांमध्ये गुलाबाची फुले लावलेली दिसत आहे. उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.