
टेलिव्हिजन जगातील माॅडेल (Model) आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच चर्चेत असते. कधी उर्फी जावेद तिच्या हाॅट आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. तर कधी तिच्या विचित्र पोशाखामुळे चर्चेत असते. त्यानंतर तिला खूप टीकेलाही सामोरे जावे लागते. नुकताच उर्फीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घालत आहे.
कोयता गॅंगनंतर आता तलवार गॅंग घालतेय धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
उर्फी जावेद सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अभिनेत्री उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने कापडाच्या चिमट्यांचा ड्रेस घातला आहे. आणि ग्लॅमरस लुक दाखवताना दिसत आहे.
ब्रेकिंग! देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांचा एकाच गाडीतून प्रवास
उर्फी जावेदने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मला काही मजेदार कॅप्शन सांगा.” उर्फीचा हा व्हिडिओ पाहून नेटकरी मजेदार कमेंट्स करत आहेत. उर्फीची फॅन फॉलोइंगही दिवसेंदिवस वाढत आहे. उर्फी अनेकदा वेगवेगळ्या स्टायलिश कपडे घालून पोज देताना दिसत आहे.
सामान्यांना चटका तर शेतकऱ्यांना दिलासा! गोकूळ डेअरीच्या दुधात ‘इतक्या’ रुपयांची वाढ
हा व्हिडिओ पाहून कमेंट्स करताना नेटकर्यांनी लिहीले की, ‘कपडे सुकवण्याचे चिमटे कुठे जात आहे..चोर पकडला गेला’. तसचे दुसर्या नेटकर्याने लिहीली की, ‘उर्फी का कोई जवाब नही’. तिला ट्रोल केलं जातं आहे. तर उर्फीचा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
“आदित्य ठाकरे यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करा”, तानाजी सावंत यांचं मोठं विधान