Site icon e लोकहित | Marathi News

Urfi Javed । उर्फीला बसला मोठा धक्का! इंस्टाग्राम अकाउंट झालं सस्पेंड

Urfi Javed

Urfi Javed । उर्फी जावेद, सगळ्या तरुणाईला माहिती असलेले नाव. उर्फीने बिग बॉस ओटीटीमधून (Bigg Boss OTT) चांगली लोकप्रियता मिळवली आहे. सोशल मीडियावर (Social media) तिचा चांगलाच बोलबाला आहे. उर्फी अतरंगी फॅशनमुळं सतत प्रकाशझोतात येते. काही लोकांनाही तिचा फॅशन सेन्स खूप आवडतो. तर काही जण तिला खूप ट्रोल करतात. परंतु, उर्फी आता वेगळ्याच कारणावरून चर्चेत आली आहे. (Latest Marathi News)

Maratha Reservation । “दुसऱ्याच्या ताटातून मराठा समाजाला आरक्षण नको, सर्वपक्षीय बैठकीत असं ठरलेलं”, शरद पवार स्पष्ट बोलले

उर्फीच्या इंस्टाग्राम अकाउंट (Instagram account) बाबत मोठी माहिती समोर आली आहे. तिचं अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. त्यामुळे उर्फीसह चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. उर्फी इंस्टाग्राम अकाउंटवर (Urfi Instagram account) बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. त्यातून ती प्रचंड पैसेही कमावते. दरम्यान, उर्फी फॅशनच्या नावाखाली विचित्र प्रयोग करत असते.

Crime News । धक्कादायक! शिपायाने अल्पवयीन मुलीवर केला वारंवार बलात्कार, गर्भवती केलं अन्…

परंतु, तिने पुन्हा एकदा तिचं अकाउंट पुन्हा चालू केलं असल्याची माहिती दिली आहे. याबाबत इंस्टाग्रामवरून एक मेसेज आला आहे, ‘तुमचे अकाउंट चुकून बंद झाल्याचे दिसते. जे आता पुन्हा सक्रिय झालं आहे. तुम्ही आता लॉग इन करू शकाल. गैरसोयीबद्दल आम्ही तुमची माफी मागतो. तुम्हाला तुमच्या खात्यात प्रवेश करण्यात काही समस्या येत असल्यास, तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद… इंस्टाग्राम टीम.’

TMKOC । ‘तारक मेहता का उल्टा चष्मा बॉयकॉट करा,’ चाहत्यांची संतप्त मागणी; नेमकं कारण काय?

Spread the love
Exit mobile version