दुर्दैवी! हेलिकॉप्टर कोसळून 6 जणांचा जागीच मृत्यू; वाचा सविस्तर

Unfortunate! 6 people died on the spot after the helicopter crashed; Read in detail

केदारनाथ: केदारनाथमधून (Kedarnath) एक दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. केदारनाथमध्ये एक हेलिकॉप्टर कोसळले (helicopter crashed) आहे. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये सहा जण बसले होते. दरम्यान या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्वच्या सर्वच म्हणजे 6 जणांचा मृत्यू (Six people died) झाला आहे. दरम्यान प्रशासनाने घटनास्थळी ताबडतोब बचाव पथक पाठवलं आहे. दरम्यान हे अपघातग्रस्त हेलिकॉप्टर आर्यन या कंपनीचं असल्याची माहिती मिळत आहे.

‘सैराट’मधील लंगड्या आणि सल्या दिसणार ‘या’ चित्रपाटाच्या मुख्य भूमिकेत

तसेच या हेलिकॉप्टरने केदारनाथ बेस कॅम्प येथून नारायण कोटी-गुप्तकाशीसाठी उड्डाण केलं होत. दरम्यान केदारनाथपासून तीन किलोमीटर अंतरावर फाटा भागात हा अपघात झाला असून यात सर्व सहा प्रवाशांचा मृत्यू झाला, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे विशेष प्रधान सचिव अभिनव कुमार यांनी माहिती दिली. केदारनाथमध्ये दाट धुके असल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज बांधला जात आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांना ह्रदयविकाराचा झटका, मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

महत्वाची बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी 21-22 ऑक्टोबर रोजी केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट देणार असताना ही घटना घडली आहे. दरम्यान या अपघातानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हणत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मुसळधार पावसाने पुण्यात घातला राडा, पाण्यात अडकलेल्या 12 जणांची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *