Site icon e लोकहित | Marathi News

मातोश्रीबाहेर येऊन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आवाहन; म्हणाले, “निवडणुकीच्या तयारीला लागा, गद्दारांना…”

Uddhav Thackeray came out of Matoshree and appealed to the workers; Said, "Get ready for elections, traitors..."

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव व पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले आहे. काल (दि.17) झालेल्या या निर्णयाने मागील साठ वर्षांचे ठाकरे व शिवसेना हे समीकरण संपुष्टात आले आहे. यामुळे ठाकरे गटाला चांगलाच धक्का बसला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज तातडीने पक्षाची बैठक बोलावली. आज (दि.18) मातोश्रीवर ही बैठक होत आहे. या बैठकीला ठाकरे गटातील सर्व आमदार, खासदार व नेते उपस्थित राहिले आहेत.

शिंदे गटाला शिवसेना व धनुष्यबाण मिळताच अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “निवडणूक आयोगाने एवढी घाई…”

यावेळी उद्धव ठाकरे यांनी कलानगरच्या गेटवर ओपन जीपमधून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाण चोरलाय त्यांनी मधमाश्यांच्या पोळीवर दगड मारलाय. त्यामुळे आता सर्व शिवसैनिकांनी निवडणुकीच्या तयारीला लागा, गद्दारांना बाळासाहेबांचा चेहरा हवा मात्र ठाकरे कुटुंब नको, अस यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

ठाकरेंना धक्क्यामागून धक्के! “कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीपर्यंतचं…”

त्याचबरोबर ते पुढे म्हणाले, निवडणूक आयोग हे मोदींचे गुलाम आहे. त्यामुळे आपण खचून जायचं नाही. मी देखील खचलेलो नाही. महाराष्ट्रामध्ये पुन्हा भगवा फडकवल्याशिवाय शांत बसणार नाही. असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

अंबानींची सून राधिका मर्चंट अनंत अंबानीपेक्षा आहे मोठी!

Spread the love
Exit mobile version