Parliament MP Suspended । खासदार निलंबनाचा सपाटा सुरूच! आणखी दोन खासदार निलंबित

Parliament MP Suspended

Parliament MP Suspended । आज हिवाळी अधिवेशनाचा (Winter sessions) शेवटचा दिवस आहे. अधिवेशन गाजलं आहे ते म्हणजे संसदेच्या सुरक्षेवरून. संसदेची सुरक्षा भेदल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आहे. संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीवरून लोकसभेत (Loksabha) आणि राज्यसभेत (Rajyasabha) मोठा गदारोळ झाला आहे. याच मुद्द्यावरून लोकसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Politics । बारामतीचा आगामी खासदार भाजपचाच होणार, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचं वक्तव्य

लोकसभा अध्यक्षांनी १४१ खासदारांना निलंबित (MP Suspended) केले होते. परंतु, आता पुन्हा २ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. विरोधी पक्षाचे खासदार सी थॉमस (C Thomas) आणि एएम आरिफ (AM Arif) यांना सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी निलंबित केले आहे. यांसह आतापर्यंत 143 खासदारांवर कारवाई केली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठली आहे.

Tiger Memon Photo । मोठी बातमी! ३० वर्षांनी मिळाला टायगर मेमनचा फोटो, पत्त्याचा देखील केला दावा

काल एकूण 49 खासदारांचं निलंबन करण्यात आलं असून यामध्ये खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचाही समावेश आहे. यासह निलंबित खासदारांची संख्या 141 वर पोहोचली आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधकांनी फक्त हे लोक कोण होते, यामध्ये कोणाचा हात आहे. याची माहिती गृहमंत्र्यांनी द्यावी अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

Kangana Ranaut । बॉलिवूडची ‘पंगाक्वीन’ करणार राजकारणात एंट्री, वडिलांनी केला मोठा खुलासा

Spread the love