Site icon e लोकहित | Marathi News

राज्यातील तीन हजार महिला दुबईमध्ये अडकल्या; रुपालीताई चाकणकर यांनी दिली धक्कादायक माहिती

Three thousand women of the state got stuck in Dubai; Rupali and Chakankar gave shocking information

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर ( Rupalitai Chakankar) यांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे. दुबईमध्ये महाराष्ट्रातील ३ हजार महिला अडकल्या असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कामाच्या आमिषाने या महिलांना दुबईमध्ये नेण्यात आले. असून त्यानंतर त्यांची कागदपत्रे काढून घेण्यात आली आहेत.

राज्यसेवा 2021 ची गुणवत्ता यादी जाहीर! सांगलीचा प्रमोद चौगुले ठरला सलग दुसऱ्यांदा अव्वल

महाराष्ट्रातील अडीच ते तीन हजार महिला ओमन आणि दुबईमध्ये अडकल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे यामधील काही महिला अहमदनगर जिल्ह्यातील असल्याचा खुलासा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केला आहे.

मागच्या पाच वर्षात अरबी समुद्रातील शिवस्मारक का झाले नाही? विधानसभेत अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

दरम्यान दुबई आणि ओमन मध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन महिलांनी ( Mharashtriyan women stucked in Dubai) महिला आयोगाशी संपर्क साधला आहे. यामुळे ही माहिती समोर आली आहे. या महिला प्रचंड घाबरल्या असून राज्यात पुन्हा येण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.

यावर रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत की, या महिलांसोबत संपर्क करणे सुरू असून याबाबत आम्ही केंद्र सरकारकडे माहिती देऊन त्या महिलांना महाराष्ट्रात कसे आणता येईल, याबाबत पाठपुरावा करणार आहोत.

ऋषभ पंतने अपघातानंतर पहिल्यांदाच दिली मुलाखत; म्हणाला, “जगण्याकडे पाहण्याचा…”

Spread the love
Exit mobile version