Site icon e लोकहित | Marathi News

‘या’ माणसाकडे आहेत सर्वात जास्त मोबाईल, पाहून व्हाल थक्क; गिनिज बुक मध्ये देखील झालीय नोंद

'This' man has the most mobile phones, you will be amazed; It has also been recorded in the Guinness book

प्रत्येक माणसाला काही न काही छंद असतोच. अनेकदा तुम्ही जुन्या वस्तू जमावण्याचा छंद असणारी माणसे आजूबाजूला पाहिलीच असतील. जुन्या नोटा, सिमकार्ड, नाणी, पोस्टाची तिकिटे यांसारख्या वस्तू अनेक लोक जमावतात. परंतु, मोबाईल जमवण्याच्या छंदाबद्दल तुम्ही ऐकले आहे का? होय ! एका माणसाला हा सुद्धा छंद आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या छंदामुळे या माणसाची चक्क गिनिज बुक मध्ये नोंद झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा अजित पवारांना पाठिंबा; म्हणाले, “अजित दादा जिकडे जाणार तिकडे…”

तुर्कस्थानातील ( Turksthan) एका व्यक्तीला मोबाईलचा संग्रह करण्याचा छंद आहे. ( Mobile Phone) या अजब गजब वेडामुळे त्याचे नाव जगभरात पोहोचले आहे. या व्यक्तीचे नाव एक्रेम कारागुदेकोग्लू असे आहे. एक्रेमकडे भरपूर चालू कंडीशनमधील मोबाईल आहेत. त्याचे मोबाईल कलेक्शन पाहून कोणाच्याही भुवया अगदी सहज उंचावतील.

विरोधकांनी केलेल्या टीकेला उदय सामंतांचे उत्तर; म्हणाले, “म्हणून महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा संध्याकाळी घेतला नाही…”

एक्रेमने आतापर्यंत दोन हजार ७९९ मोबाईल फोन जमावले आहेत. जगातील सगळ्यात मोठे मोबाईल कलेक्शन असणारी व्यक्ती म्हणून एक्रेम ओळखला जातो. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या ऑफिशियल साईटवर त्याच्या मोबाईल जमवण्याची नोंद झाली आहे. त्याच्याकडे १५० वेगवेगळ्या मॉडेल्सचे मोबाईल फोन आहेत. एखादे पुस्तकांचे ग्रंथालय जसे असते तसे एक्रेमने मोबाईलचे म्युझिअम केले असून त्यामध्ये प्रत्येक मोबाईलला नंबर दिले आहेत. त्याच्याकडे जगातील सगळ्या ब्रँड्सचे मोबाईल आहेत.

अजित पवार पुण्यातील दौरा रद्द करून गायब! राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता; चर्चांना उधाण

Spread the love
Exit mobile version