Site icon e लोकहित | Marathi News

शिवजयंतीपूर्वी हे सरकार कोसळणार – अमोल मिटकरी

This government will collapse before Shiv Jayanti - Amol Mitkari

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यापासून शिवसेनेचे ठाकरे व शिंदे असे दोन गट पडले. या दोन्ही गटांमध्ये शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण कुणाचा ? यावरून वाद सुरू आहेत. याबाबत काल निवडणूक आयोगात सुनावणी सुरु होती. मागील अनेक दिवसांपासून रखडलेला हा निर्णय किमान कालतरी होईल म्हणून या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र कालही शिवसेना व धनुष्यबाण नेमका कुणाचा ? यावर निर्णय झाला नसून याबाबतची सुनावणी पुढे ढकलली गेली आहे. यानंतर अनेक नेत्यांनी वेगेवेगळी वक्तव्य केली आहेत. यामध्येच आता अमोल मिटकरी यांचे ट्विट चर्चेत आले आहे.

राज्यसेवा मुख्यपरीक्षेत धक्कादायक प्रकार! परीक्षेवेळी ब्लूटूथचा वापर करणाऱ्या उमेदवारावर गुन्हा दाखल

अमोल मिटकरी यांनी ट्विट करत लिहिले की, “सरकारचे काउंट डाऊन सुरू. शिवजयंती पुर्वी महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होणार हे नक्की”. सध्या या ट्विटच्या राजकीय वातावरणात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.

निवडणूक आयोगावर आमचा विश्वास नाही, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचे गंभीर आरोप…

दरम्यान, सोमवारी 23 जानेवारी रोजी शिंदे व ठाकरे गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. या दोन्ही गटांकडून लेखी उत्तरं मिळाल्यानंतर निवडणूक आयोग पुढील सुनावणी ३० जानेवारीला करणार आहे.

तिने ब्रेक ऐवजी अँक्सिलेटर दाबला आणि पुढची घटना वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

Spread the love
Exit mobile version