
आपल्या शरीरयष्टीच्या जोरावर रेसलर खलीची कीर्ती सर्वदूर पसरलेली आहे. दरम्यान सध्या एका सामान्य मजुराच्या मुलाने शरीरयष्टीच्या बाबतीत खलीला देखील मागे सारले आहे. या मुलाची उंची खलीपेक्षा जास्त असून त्याचे शरीर देखील भरभक्कम आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटू शकते कारण हा मुलगा एका वेळेला 18 चपात्या आणि अडीज लीटर दूध पितो. मात्र तरीदेखील त्याची भूक काही मिटत नाही. खूपदा त्याला अर्धपोटीच रहावे लागते.
मटण खाऊन महादेवाचं दर्शन घेतल्याच्या आरोपावर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…
उत्तरप्रदेश ( UP) मधील हमीरपूर या जिल्ह्यातील मौधा या भागामध्ये असलेल्या इचौली नायकपुरा या गावातील हा मुलगा आहे. याचे नाव सिराज असे असून भक्कम शरीरामुळे व उंचीमुळे तो खलीसारखा दिसतो. सिराजच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून त्याचे वडील शिपाही लाल मजुरी करतात. सिराज सध्या फक्त 18 वर्षाचा आहे. मात्र तरी देखील त्याने जगप्रसिद्ध खलीला (Khali) मागे टाकले आहे.
सॅमसंगच्या ‘या’ लोकप्रिय फोल्डेबल फोनवर मिळवा 49 टक्केंची सूट! वाचा भन्नाट ऑफर
सिराज सध्या पदवीचे शिक्षण घेत असून त्यानंतर त्याला सैन्यात ( Army) भरती व्हायचे आहे. त्याची उंची सध्या 7.2 फूट असून खलीची उंची 7.1 फूट इतकी आहे. त्याचे वजन 115 किलो असून कोणत्याही आधाराशिवाय तो 90 किलो वजन फक्त एकटाच उचलू शकतो. उंची जास्त असल्याने स्वतःच्या घरात प्रवेश करताना देखील त्याला वाकून चालावे लागते. खलीला मागे टाकणारा हा सिराज सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे.
“सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेवाचं दर्शन घेतलं” शिंदे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप