Site icon e लोकहित | Marathi News

‘या’ शेतकऱ्यांना मिळाले विहिरीसाठी लाखोंचे अनुदान; यादी झाली जाहीर

'These' farmers got a grant of lakhs for wells; The list has been announced

राज्य सरकारने मनरेगा सिंचन योजने ( Manrega Sinchan scheme) अंतर्गत मागेल त्याला विहरीसाठी अनुदान जाहीर केले होते. या अनुदानासाठी राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केला होता. दरम्यान अनुदानास पात्र झालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली आहे. ( List of farmers) यामध्ये पात्र शेतकऱ्यांची नावे व त्यांना किती अनुदान मिळाले आहे. याची माहिती देण्यात आली आहे. ही यादी कशी पहायची याबाबत जाणून घेऊयात…

Gautami Patil । गौतमीचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या मुलाचे वय पाहून पोलिसांनाही बसला धक्का!

यादी पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा

१) सर्वप्रथम मनरेगाच्या nrega.nic.in या वेबसाईटला भेट द्या.
२) तेथे ग्रामपंचायत वर जाऊन generate report वर क्लिक करा.
३) याठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र राज्य निवडावे लागेल.
४) पुढे आर्थिक वर्ष, जिल्हा, तालुका व गाव निवडा आणि पुढे प्रोसिड करा.
५) येथे तुमच्या गावाचा डॅशबोर्ड दिसेल. यात गावात सुरू असणाऱ्या कामांची यादी दिसेल.
६) याठिकाणी work status वर क्लिक केल्यावर तुम्हाला चालू वर्षातील वैयक्तिक कामे दिसतील.
७)या कामांच्या यादीत विहीर अनुदान मंजूर झालेल्या शेतकऱ्यांची यादी दिसेल.

Sharad Pawar । शरद पवारांच्या निर्णयाने पक्षातील इतर नेते नाराज; पक्षामध्ये अंतर्गत कलह सुरू होणार?

या यादीत तुम्हाला सर्व पात्र शेतकऱ्यांची नावे दिसतील. तसेच कोणत्या शेतकऱ्याला किती लाखांचे अनुदान मिळाले आहे. याची माहिती मिळेल. याशिवाय इतर योजनांबाबतची माहिती व महत्त्वाच्या याद्या तुम्हाला याठिकाणी पहायला मिळतील.

मोठी बातमी! गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक

Spread the love
Exit mobile version