
मुंबई : बॉलीवूड चित्रपटांमधून अनेक कलाकार (Artist) आपला अभिनय दाखवत असतात. दरम्यान अनेक अनेक कलाकार स्वतःला सुंदर, फीट, तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. शरीराने फिट (Fit body) राहण्यासाठी हे कलाकार योगा, जिमबरोबरच (gym) योग्य डाएटचेही ते कठोरपणे पालन करतात. चित्रपट सृष्टीतील अनेक असे कलाकार आहेत जे त्यांच्या अभियानासोबतच त्यांच्या फिटनेससाठी ओळखले जातात. बऱ्याचदा त्यांना मिळणाऱ्या भूमिकांनुसारही ते आपल्या तब्येतीमध्ये बदल करत असतात. चाहत्यांमध्येही अनेक स्टार्स त्यांच्या फिटनेससाठी ओळखले जातात, यामध्ये फिटनेससाठीचा बाप म्हणून विद्युत जामवालला ओळखले जाते.
विद्युत जामवाल
अभिनेता विद्युत जामवाल हा बॉलीवूड इंडस्ट्रीत त्याच्या अभिनयापेक्षा अॅक्शनसाठी ओळखला जातो.चाहत्यांमध्ये अभिनेता जामवालच्या चित्रपटातील स्टंटबाजीमुळे मोठी क्रेझ आहे. जामवाल हा कितीही अवघड स्टंट असला तरी एकदम सहजतेने करतो.पण महत्वाची अभिनय सोडून महत्वाची बाब म्हणजे तो स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतो. वर्कआऊटसोबतच तो त्याच्या डाएटवर विशेष लक्ष देतो. विद्युत जामवाल हा शाकाहारी जेवणाला प्राधान्य देतो. शाकाहारी जेवणात अधिक पोषण असते. असे त्यांचे मत आहे.
हृतिक रोशन
बॉलीवूडमधील अभिनेता हृतिक रोशनला पाहतच चाहते त्याच्या फिटनेसवर फिदा होतात.अभिनयासोबतच स्वत:ला फिट ठेवण्यासाठी हृतिक खूप मेहनत घेतो. हृतिक दररोज त्याच्या वर्कआउट रूटीन आणि त्याच्या आहाराची देखील विशेष काळजी घेतो.अभिनेता हृतिक रोशन त्याच्या वर्कआउट रूटीनमध्ये वॉर्मअप, स्ट्रेचिंग आणि पुशअप्स फॉलो करतो. विशेष म्हणजे हृतिक पार्ट्या आणि ड्रिंक्सपासून मुळातच दूर राहतो. विशेष म्हणजे अभिनेता हृतिक दर रविवारी योगा करून दिवसाची सुरुवात करतो.
मोठी बातमी! मनेसे नेते वृशांत वडके यांच्यावर बलात्काराचा आरोप; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
टायगर श्रॉफ
अभिनेता टायगर श्रॉफने थोड्याच कालावधीत बॉलीवूडमध्ये स्वतःचे स्थान बळकट केले आहे. टायगर श्रॉफच्या बॉडी आणि मार्शल आर्ट्ससाठी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे चाहते आहेत. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी तो जिममध्ये नियमितपणे वर्कआउट करतो. किकबॉक्सिंग, जिम्नॅस्टिक्स, तायक्वांदो आणि वुशु या व्यायाम प्रकारातही त्याला खूप रस आहे.
पपईची लागवड केल्यावर शेतकऱ्यांना मिळणार ‘एवढी’ सबसिडी, असा करा अर्ज
अक्षय कुमार
बॉलिवूडमधील खिलाडी अक्षय कुमार म्हणल की स्वतच्या अभिनयातून सगळ्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता.दरम्यान अक्षय कुमार त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो.अक्षयकुमार स्वतःला फीट ठेवण्यासाठी लवकर उठतो,तसेच धावणे, योगा ,यासोबतच तो जिमही करतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अक्षयकुमार कुठल्याही लेटनाईट पार्टी अटेंड करत नाही. फिटनेससाठी तो कठीण परिश्रम घेत असतो. एवढच नव्हे तर शाकाहारी जेवण घेण्यावर अधिक भर देताना दिसून येतो.
जॉन अब्राहम
जॉन अब्राहम हा ॲक्टिंग आणि फिटनेसचा बादशाह म्हणून चाहत्यांच्या मनावर नेहमी राज्य करत असतो.स्वत:ला फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतो.जॉन आपल्या आहारात भरपूर प्रोटीन तर घेतोच पण जास्तीत जास्त लक्ष झोपेकडे देतो. फायबरसाठी जॉन अब्राहम हा फळे आणि हिरव्या भाज्याही खातो. तसेच त्याने वर्कआउट सत्र दोन भागांमध्ये विभागले असून एक प्रमुख आणि एक लहान असे आहे. यासह, तो अधिक बॉडीबिल्डिंग करतो आणि एका दिवसात त्याच्या शरीराच्या दोन भागांवर काम करतो.