Site icon e लोकहित | Marathi News

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात फडणवीसांनी केल्या ‘या’ १० महत्वाच्या घोषणा; वाचा एका क्लिकवर

'These' 10 important announcements made by Fadnavis in the Maharashtra budget; Read in one click

राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यांनतर पहिलाच अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण अर्थसंकल्प हा आयपॅडमधून वाचला आहे.

अजित पवार यांनी नेमका कुणाला डोळा मारला? सोशल मीडियावर होतेय ‘त्या’ व्हिडिओची जोरदार चर्चा

महत्वाच्या १० घोषणा –

१) केंद्र सरकारचे 6 हजार आणि राज्याचे 6 हजार असे मिळून शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी 12 हजार रुपये मिळणार.
२) राज्यातील शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयामध्ये पीक विमा मिळणार.
३) 10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम
४) महिला वर्गाला एसटीमध्ये ५० टक्के सूट
५) अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये वाढ
६) महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत, 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार.
७) निराधार योजनांमध्ये वाढीव अर्थसहाय्य मिळणार
८) गुढीपाडव्याला १ कोटी ६३ लाख शिधाधारकांना आनंदाचा शिधा मिळणार.
९) शिक्षणसेवकांच्या मानधनामध्ये वाढ.
१०) शेतकऱ्यांना कर्जमाफी.

मोठी बातमी! अर्थसंकल्पात फडणवीसांनी केली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची घोषणा, पाहा नेमकी काय आहे घोषणा?

Spread the love
Exit mobile version