Site icon e लोकहित | Marathi News

Chandrakant Khaire: “मुख्यमंत्र्यांच्या भाषणात अजिबात दम नव्हता..”, चंद्रकांत खैरेंची एकनाथ शिंदेंवर पैठणच्या सभेवरून बोचरी टीका

"There was no breath in the Chief Minister's speech.", Chandrakant Khairen's criticism of Eknath Shinde from the Paithan meeting

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांची काल पैठणमध्ये सभा झाली.या सभास्थळी 9 ते 10 हजार खुर्च्यां लावण्यात आल्या होत्या.तसेच विमानतळापासून ते सभास्थळापर्यंत पोलीस (police) तैनात करण्यात आले आहेत. शिंदेगट आणि शिवसैनिकांमध्ये (shivsainik)सुरु असलेल्या वादानंतर या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. दरम्यान यासभेवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी टीका केली आहे.

पपईची लागवड केल्यावर शेतकऱ्यांना मिळणार ‘एवढी’ सबसिडी, असा करा अर्ज

मुख्यमंत्री घाबरलेल्या अवस्थेत बोलत होते. त्यांच्या भाषणात अजिबात दम नव्हता, असं म्हणत त्यांनी टीका केली आहे. पुढे खैरे म्हणाले की, एकनाथ शिंदे हेच गलिच्छ राजकारण करतात, त्यांनी उपकारांची जाणिव ठेवली नाही. एवढच नाही तर मुख्यमंत्र्यांच्या सभेला 300 रुपये आणि 500 रुपये देऊन लोक आणले होते, असा दावा खैरेंनी काल सभेवेळी केला होता.

Mahima Chaudhary: “त्या काळी व्हर्जिन असणाऱ्या अभिनेत्रींनाच…”अभिनेत्री महिमा चौधरींनी सिनेसृष्टिबाबत केला धक्कादायक खुलासा

दरम्यान सभेला उपस्थित असलेल्या शिंदे कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.एका कार्यकर्त्याने “आम्ही स्वखर्चाने या सभेला आलो आहोत”, अशी प्रतिक्रिया दिली. तर मुख्यमंत्र्यांच्या प्रेमापोटी आम्ही या सभेला हजर झालो आहोत, आम्हाला कुठलेच पैसे मिळाले नाहीत, असं दुसऱ्या कार्यकर्त्याने स्पष्ट केलं.

मोठी बातमी! मनेसे नेते वृशांत वडके यांच्यावर बलात्काराचा आरोप; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

Spread the love
Exit mobile version