Site icon e लोकहित | Marathi News

‘ये रिश्ता क्या कहलता है’ मधील अभिनेत्याने अफेअरच्या चर्चांवर केला मोठा खुलासा; म्हणाला “चारू असोपा आणि मी…”

The 'Yeh Rishta Kya Kehlata Hai' actor made a big revelation on the affair talks; Said "Charu Asopa and I..."

मालिकांमधील कलाकार प्रेक्षकांना जवळचे वाटत असतात. कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील त्यांना प्रचंड उत्सुकता असते. यामुळे या कलाकारांच्या लाइफस्टाइल व अफेअर्सच्या चर्चा सोशल मीडियावर कायम रंगलेल्या असतात. बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि त्याची पत्नी चारू असोपा यांच्या रिलेशनशिपमधील वादांवर देखील मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील लवकरच दौंड दौऱ्यावर; राहुल कुल यांनी घेतली भेट

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या स्टार प्लस वरील मालिकेमधील नैतिक फेम करण मेहराचे आपली पत्नी चारुसोबत अफेअर सुरू असल्याचा, आरोप केला होता. मात्र नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये स्वतः करण मेहराने याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे.

 विहीरीसाठी अनुदान मिळवणे झाले आणखी सोप्पे! सरकारने ‘ही’ अट रद्द केल्याने शेतकऱ्यांना होणार फायदा

मुलाखती दरम्यान करणला चारू असोपा व त्याच्या रिलेशनशीप बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्याने ” हा मुर्खपणा आहे. राजीव कोणत्या करण मेहराबाबत बोलत आहे, याबद्दल मला काहीच माहीत नाही. माझा चारू असोपाबरोबर कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. आम्ही दहा वर्षांपूर्वी एकत्र काम केलं होतं. त्यानंतर आम्ही एकमेकांच्या संपर्कातही नाही आहोत”. असे उत्तर दिले आहे. यामुळे करण मेहरा व चारू असोपा यांच्यात कुठले नाते नसल्याचे स्पष्ट होत आहे.

शरद पवारांवर रुग्णालयात नक्की कोणते उपचार सुरू आहेत? डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं

Spread the love
Exit mobile version