
उर्फी जावेद व भाजप नेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh BJP) यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. उर्फीच्या अंगप्रदर्शन करण्यावरून चित्रा वाघ यांनी ट्विट करत तिला चांगलेच सुनावले होते. उर्फीने देखील मागे न हटता ट्विटवरून चित्रा वाघ यांना प्रतिउत्तर देणे सुरूच ठेवले. याकाळात चित्रा वाघ यांनी ‘उर्फीवर कायदेशीर कारवाई करून अटक करा’ अशी मागणी मुंबई पोलिसांकडे केली होती.
ललित मोदी ऑक्सिजन सपोर्टवर; तब्येत खालावली! सुश्मिता सेनच्या भावाने दिली माहिती
दरम्यान मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police) या प्रकरणी दखल घेतली आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन करणाऱ्या उर्फी जावेदला पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. याप्रकरणी उर्फीची काल चौकशी देखील करण्यात आली. चौकशी झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी उर्फी जावेदनेने नवीने फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
साडीने पेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “थोडस दुर्देव होतं बाकी…”
कपड्यांमुळेच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या उर्फीने पोलीस चौकशींनंतर लगेचच इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केल्याने चर्चाना उधाण आले आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून. नेटकरी यावर वेगेवगेळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.
भाजप खासदार बृजभूषण संभाजी महाराजांबद्दल बोलताना चुकले; म्हणाले…