
मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माते अब्दुल गफ्फार नाडियादवाला (A. G. Nadiadwala) यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. वयाच्या ९१ व्या वर्षी अखेर त्यांनी शेवटचा श्वास घेतला. मुंबईतीमधील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होता या उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका होऊन त्यांचे निधन झाले. ते अनेक आजारांशी झुंज देत होते. अखेर ए जी नाडियादवाला यांनी आज पहाटे १.४० वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा मुश्ताक नाडियादवाला (Mushtaq Nadiadwala) यांनी याबाबतची माहिती दिलीये.
Ajit Pawar: मुख्यमंत्री देखील जनतेतूनच थेट निवडून आणा – अजित पवार
९० च्या दशकामध्ये ए जी नाडियादवाला यांनी एंक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली होती. चित्रपटसृष्टीमध्ये ते गफ्फारभाई म्हणून लोकप्रिय होते. नाडियादवाला यांनी ‘लहू के दो रंग’, ‘आ गले लग जा’, ‘हेरा फेरी’, वेलकम यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली होती. त्यांच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कलेक्शन देखील दमदार होते. त्यांचे चित्रपट हे भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये खूपच लोकप्रिय चित्रपट होते.
Deepest condolences on the passing of Shri Gaffarbhai Nadiadwala. My father & he were associates during the golden era of our cinema. 🕉 Shanti AG Nadiadwala saab. My condolences to the Nadiadwala family. pic.twitter.com/xf1oxwhOoH
— Ajay Devgn (@ajaydevgn) August 22, 2022
दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून नाडियादवाला यांना मधुमेह आणि दमा यांसारखे अनेक आजारांनी होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार देखील सुरु होते. पण काल त्यांची तब्बेत जास्त बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले पण पहाटेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका झाला आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Anupam Kher: “तुम्ही आधी…..” , लाल सिंग चड्ढा फ्लॉप होताच अनुपम खेर यांनी आमीरला खडसावले