Site icon e लोकहित | Marathi News

शाहरुखच्या घरामध्ये भिंत तोडून घुसलेल्या ‘त्या’ दोन तरुणांबाबत पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

The police gave shocking information about 'those' two youths who broke the wall in Shah Rukh's house

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. मागच्या काही दिवसापूर्वी शाहरुखच्या घरामध्ये दोन तरुणांनी मध्यरात्री भिंत तोडून आत जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली होती. आता याबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. हे दोन तरुण तब्बल आठ तास शाहरूखच्या मेकअपरूममध्ये लपल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

शरद पवारांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा; म्हणाले, “माझ्या जन्माच्या तिसऱ्या दिवशी…”

दरम्यान, मागच्या काही दिवसापूर्वी मध्यरात्री भिंत तोडून शाहरुखच्या मन्नत या बंगल्यामध्ये दोन तरुणांनी घुसण्याचा प्रयत्न केला होता. शाहरुखच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न करणारे दोन तरुण गुजरातमधील असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून मुंबई पोलिसांनी त्या दोघांना अटकदेखील केली आहे. माहितीनुसार, १९ ते २० वर्षे वयाचे ते दोन तरुण आहेत.

दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर बच्चू कडू यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “…त्या कायद्याची ऐशी की तैशी”

सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी या दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींचे नावे पठाण साहिल सलीम खान आणि राम सराफ कुशवाह अशी आहेत.

अजित पवारांना मोठा धक्का; अहमदनगर जिल्हा सहकारी बँक भाजपच्या ताब्यात

Spread the love
Exit mobile version