Site icon e लोकहित | Marathi News

गिरीश बापट यांच्या निधनाने राष्ट्रवादीचा नेता ढसाढसा रडला!

The NCP leader cried profusely on the demise of Girish Bapat!

पुण्याचे माजी महापौर आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. यामध्येच आता गिरीश बापट यांच्या जाण्याने राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांना अश्रू अनावर झाले.

गिरीश बापट यांच्या जाण्यानं पक्षाचं मोठं नुकसान – विनोद तावडे

राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘आठवड्यामध्ये दोन वेळा मी गिरीश बापट यांची भेट घ्यायचो. त्यांना दडपे पोहे आवडत असून माझ्या बायकोने त्यांच्यासाठी पोहे केले होते. ते मी घेऊन गेलो, त्यावेळी ते म्हणाले ‘अरे मला जास्त काही जेवण जात नाही, कशाला आणले’ ते ऐकून मला खूप दुख झालं’ असं म्हणत माध्यमांशी बोलताना अंकुश काकडे यांना अश्रू अनावर झाले.

गिरीश बापट यांनी पुण्याच्या विकासात दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील – देवेंद्र फडणवीस भावुक

दरम्यान, त्यांच्यावर अंत्यविधी संध्याकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशान भूमीत होणार आहे. गिरीश बापट राजकारणामध्ये खूप सक्रिय होते. त्यांच्या निधनाने भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याच्या भावना राजकीय नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

गिरीश बापट यांच्या निधनाची माहिती मिळताच शरद पवार भावूक; म्हणाले…

Spread the love
Exit mobile version