
मोहोळ (mohol) तालुक्यातील पापरी गावात एक आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे. पापरी येथे एका गायीने (cow) चार वासरांना (Birth to four calf) जन्म दिला आहे. महत्वाचं म्हणजे ही चारही वासरे अगदी धडधाकट आहेत. त्यामुळे या घटनेची चर्चा सर्वत्र सोलापूर (Solapur) जिल्ह्यात सुरू आहे.
पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवार अखेर बोललेच; म्हणाले
शेतकरी आपल्या जणावारांना नेहमीच जपत असतात. गायींसाठीचा चारा, खुराक आणि पाणी या सगळ्यांची पुर्तता करण्यात शेतकरी रात्रंदिवस राबत असतात. पापरी येथे एक अजब प्रकार गावकरी आणि शेतकऱ्यांना पहायला मिळाला आहे. गायीने चक्क एकाच वेळी दोन वासरांना जन्म दिल्याचे तुम्ही ऐकलं असेल. पण पापरी येथिल एका गायीने चार वासरांना जन्म दिला आहे.
महिलेच्या चतुरपणाला सलाम! सेल्फी घ्यायची म्हणत अभिनेत्याजवळ आली
या घटनेनंतर गावकऱ्यांसह पंचक्रोशी या चार वासरांची चर्चा सुरू आहे. तसेच या वासरांना पाहण्यासाठी गोठ्यावर गर्दी होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. या गायीचे मालक गणेश लोंढे आहेत. त्यांनी २०१७ ला मुंबईतली नोकरी सोडून दिली. त्यानंतर गावची शेती करण्याचा निर्णय घेतला आणि शेतीला जोडधंदा म्हणून गायी विकत घेतल्या. २०१८ मध्ये लोंढे यांनी लक्ष्मी नावाची गाय घेतली. ही गायी लोंढे कुटुंबासाठी खरच लक्ष्मी ठरली आहे.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ मार्गावर मिळणार
दरम्यान, गायीने चार वासरांना जन्म देणे अशा घटना क्वचितच घडतात. असे झाले तरी वासरांना धोका असतो पण ही चारही वासरे ही सदृढ आहेत. शिवाय तीन कालवडी आणि एक खोंड असल्याने शेतकऱ्याला याचा अधिकचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.