Site icon e लोकहित | Marathi News

पीएम किसान लाभार्थ्यांची चिंता वाढली! 12 वा हप्ता दिवसेंदिवस लांबतोय, कारण…

The concern of PM Kisan beneficiaries increased! 12th installment is getting longer day by day because….

देशातील ग्रामीण भागातील शेतकरी पीएम किसान योजनेतील निधीसाठी चिंताग्रस्त आहेत. कारण पीएम किसान योजनेचा (PM Kisan Scheme) 12 वा हप्ता दिवसेंदिवस लांबत आहे. 9 ऑगस्ट रोजीच 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर (Farmer Account) जमा करण्यात येणार होते. त्यामुळे आता किमान सप्टेंबरमध्ये का होईना ही रक्कम पदरी पडेल अशी लाभार्थ्यांना आशा होती. परंतु अजून तारिखही जाहीर नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमतेचे वातावरण आहे. गेल्या 5 वर्षापासून पीएम किसान योजनेत सातत्य राहिलेले आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत पुन्हा मोदींकडून शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट मिळणार का हे देखील पहावे लागणार आहे.

सातारा जिल्ह्यातील बैलगाडा शर्यतीवर लम्पी रोगाचा परिणाम, बैलांच्या बाजार आणि प्रदर्शनाला बंदी

अस शोधा यादीतील लाभार्थ्यांचे नाव

तसेच जे नियमित लाभार्थी आहेत त्यांना आपले नाव यादीत आहे का नाही, हे देखील पाहता येणार आहे. यासाठी https://pmkisan.gov.in या होमपेजवर जावा. पुढे होम पेजवरील मेनू बारला क्लिक करुन ‘फार्मर कॉर्नर’वर जावं. त्यानंतर येथील लाभार्थी यादीवर क्लिक करा म्हणजे स्क्रीनवर पेज ओपन होईल. यामध्ये राज्य, जिल्हा, तालुका, गाव हे चेक करीत आपले नाव शोधावे लागणार आहे.

Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीसांचा पीएफआयच्या समर्थकांना इशारा,”…पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही”

2018 पासून योजना सुरु

पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपये मिळतात. 4 महिन्यातून एकदा 2 हजार रुपये लाभार्थ्यांस दिले जातात. खरतर ही योजना 2018 पासून सुरु आहे. महत्वाची बाब म्हणजे शेती व्यवसयात या निधीचा वापर करता यावा हाच त्यामागचा हेतू आहे. परंतु ज्या खातेदारांकडून नियमांचे उल्लंघन झाले आहे. त्यांच्याकडून पूर्वीपासून जमा झालेल्या निधीची वसुली केली जात आहे. त्यामुळे तांत्रिक बाबी निर्माण होत आहेत. ऑगस्ट महिन्यात मिळणारा हप्ता आता सप्टेंबर अखेरीसही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही.

Narendra Modi: धक्कादायक! पिएफआयच्या निशाण्यावर होते पंतप्रधान नरेंद्र मोदी; ईडीने केला दावा

Spread the love
Exit mobile version