
Thane News । दररोज कित्येक अपघात (Accident) होत असतात, काही ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडत असतात. यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागते. परंतु, या अपघातांमुळे अनेकांचे संसार काही क्षणात उध्वस्त होत असतात. सध्या अशीच काहीशी एक घटना घडली आहे. यामध्ये इमारतीत भीषण आग (Fire in building) लागून एकाच कुटुंबातील दोन जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या दरम्यान ठाणे येथील घोडबंदर रोडवर (Ghodbunder Road) एका इमारतीला आग लागली. माधवी निवास ही इमारत वाघ बीळ नाका परिसरात आहे. पहाटे या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अचानक आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्र रूप धारण केले. आग पहाटे लागली असल्याने लोक गाढ झोपेत होती. त्यामुळे या आगीमध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.
Ahmednagar Crime News । पारनेरमध्ये जागेच्या वादामधून अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह आईची हत्या
तीन जणांनी आपला जीव मुठीत धरून पळ काढला, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Fire brigade) जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. अग्निशमन दलाला अथक प्रयत्नांनतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. परंतु ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण समजले नाही.
Politics News । 31 डिसेंबरपर्यंत शिंदे सरकार पडणार, बड्या नेत्याच्या दाव्याने उडाली खळबळ